Gold- Silver Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं १७००० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Gold- Silver Price Drop: सोनं-चांदी खरेदी करणारऱ्यांसाठी आज खरेदीची चांगली संधी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर...

Priya More
  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे

  • आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात १७००० रुपयांची घसरण झाली

नवरात्रीमध्ये सोनं-चांदीच्या दरात दररोज बदल झाल्याचे पाहायला मिळाले. नवरात्र संपल्यानंतर देखील सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्राहकांचा दागिने खरेदीकडे कल आहे. अशात सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीचे दर देखील घसरले आहेत. १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी आजचे सोनं- चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १७०० रुपयांची स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४४,३८० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,४३,८०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आज चांगील संधी आहे.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १५५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३२,३५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १५,००० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,२३,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात त्यामुळे आज तुम्हाला २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटचे सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १२७० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०८,२९० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं १२,७०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १०,८२,९०० रुपये खर्च करावे लागतील. आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. १ ग्रॅम चांदी २२५ रुपयांना विकली जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची घसरण झाली आहेत. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,२५,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 उमेदवारांच्या अर्ज बाद

Clothes Washing Tips: कपडे धुण्यापूर्वी किती वेळ भिजत घालावेत? रात्रभर कपडे भिजवून ठेवल्याने कपड्यांचे काय नुकसान होते?

Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; मुख्य अभिनेत्री भावुक, चाहते नाराज

Satbara Utara: फडणवीस सरकारकडून मोठा दिलासा, सामायिक सातबारा जमीन विक्रीबाबत महत्वपूर्ण निर्णय

Washing Machine Tips: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरावं का?

SCROLL FOR NEXT