Today gold rate 24K 22K 18K in Mumbai Pune : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. डॉलरची घसरती किंमत,युद्धाचे सावट अन् अस्थिर जागतिक बाजारामुळे देशातील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. आज, शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १४७० रूपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १३५० रूपयांनी वाढ झाली. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत १११० रूपयांनी वाढली आहे. मुंबई, पुणे, जळगावपासून दिल्ली अन् चेन्नईपर्यंत सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. पाहूयात सोनं अन् चांदीचे आजचे दर काय आहेत..
शनिवारी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याची किंमत १४७० रूपयांनी वाढून प्रति तोळा १५८७७० रूपये इतकी झाली आहे. तर प्रति ग्रॅम सोन्याची किमत १४७ रूपयांनी वाढ झाली असून आज बाजारात एक ग्रॅम सोनं १५८७७ रूपयांनी मिळत आहे. १० तोळं सोन्याची किंमत १४ हजार ७०० रूपयांनी वाढून १५८७७०० रूपये इतकी झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति ग्रॅम १३५ रूपयांनी वाढून १४५५५ रूपयांवर पोहचलेय. तर १ तोळं सोन्याची किंमत १४५५५० रूपयांवर पोहचलेय. २२ कॅरेटचे सोनं प्रति तोळा १३५० रूपयांनी वाढलेय. १० तोळं सोन्याची किंमत १३५५० रूपयांनी वाढून १४५५५०० रूपये इतकी झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही प्रति तोळा १११० रूपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार १८ कॅरेट सोनं प्रति तोळा ११९१२० रूपयांनी मिळतेय. तर प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १११ रूपयांनी वाढून ११९१२ रूपये इतकी झाली आहे. तर १० तोळं सोन्याची किंमत १११०० रूपयांनी वाढून ११९१२०० रूपये इतकी झाली.
पुणे, मुंबई -
२४ कॅरेट- ₹१५,७१६
२२ कॅरेट कॅरेट ₹१४,४०६
१८ कॅरेट - ₹११,७८७
दिल्ली -
२४ कॅरेट - ₹१५,९००
२२ कॅरेट -₹१४,५००
१८ कॅरेट- ₹११,९००
कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद -
२४ कॅरेट - ₹१५,९००
२२ कॅरेट- ₹१४,४००
१८ कॅरेट -₹११,८००
चेन्नई
२४ कॅरेट - ₹१५,८७४
२२ कॅरेट - ₹१४,५५१
१८ कॅरेट ₹१२,१३६
२४ जानेवारी - २४ कॅरेट सोन्याचा दर १५,८७७ रुपये प्रति ग्राम पर्यंत पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर १४,५५५ रुपये प्रति ग्राम आहे
२३ जानेवारी - २४ कॅरेट सोने १५,७३० रुपये (२८४ रुपयांची वाढ) आणि २२ कॅरेट १४,४२० रुपये (२६० रुपयांची वाढ) होते.
२२ जानेवारी – २४ कॅरेट १५,४४६ रुपये (-२२९) आणि २२ कॅरेट १४,१६० रुपये (-२१०).
२१ जानेवारी - २४ कॅरेट १५,६७५ रुपये (+६८४) आणि २२ कॅरेट १४,३७० रुपये (+६२५) झाले.
२० जानेवारी- २४ कॅरेट १४,९९१ (+३५२) आणि २२ कॅरेट १३,७४५ (+३२५) होते.
१९ जानेवारी- २४ कॅरेट १४,६३९ (+२४६) आणि २२ कॅरेट १४,१३० (+२२५) होते.
१८ जानेवारी - – २४ कॅरेट १४,३९३ रुपये आणि २२ कॅरेट १३,१९५ रुपये (कोणताही बदल नाही).
१७ जानेवारी – २४ कॅरेट १४,३९३ (+३८) आणि २२ कॅरेट १३,१९५ (+३५).
१६ जानेवारी – २४ कॅरेट १३,३५५ (-२२) आणि २२ कॅरेट १३,१६० (-२०).
१५ जानेवारी- २४ कॅरेट १४,३७७ (-३८) आणि २२ कॅरेट १३,१८० (-३५) होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.