

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी
Teacher brutally beats class 4 student in Buldhana : विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकानेच क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा येथे उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ गणित सुटले नाही, या कारणावरून एका चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
१३ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र याचाही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसत नाही. शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थ्यांवर सध्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीत शिकणारा पवन इंगळे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचं वय साडेनऊ वर्षे आहे. तर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव रवींद्र असा आहे. पिंपळगाव राजा पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पिंपळगाव राजा पोलिसांनी सदर विद्यार्थ्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं, त्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र अवघ्या साडेनऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकावर अद्यापही पोलीस अथवा शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही. या प्रकारामुळे मात्र मोठ्या प्रमाणात पालकांमध्ये संताप दिसत आहे. आता पोलिस आणि शिक्षण विभाग या शिक्षकांवर काय कारवाई करतो हे बघणं महत्त्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.