Todays Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : 'व्हॅलेंटाईन डे'ला सोनं महागलं, प्रतितोळा ₹१९७०ने वाढले, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Gold Silver Rate Today 14 Feb 2026: चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

Namdeo Kumbhar

24, 22 carat gold rate per tola today Mumbai Pune Jalgaon : ४ दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज व्हॅलेंटाईन डेला सराफा बाजार उघडताच २४ तोळा सोनं प्रति तोळा १९७० रूपयांनी वाढले आहे. देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. लग्नसराईत सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक चिंतेत आहेत.

आजच्या सोन्याच्या किंमती किती ?

२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५७,७५० रुपये इतकी झाली आहे. यामध्ये १९७० रूपयांची वाढ नोंदवली गेली. शक्रावर प्रति १० ग्रॅम १५५,७८० रुपये इतकी किंमत होती.

२२ कॅरेट सोन्याच्या किमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति १० ग्रॅम ₹१४४,६०० आहे. शुक्रवारच्या तुलनेत १८०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹११८,३१० रूपये इतकी झाली आहे. १४७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ११६८४० रूपये इतकी होती.

प्रति ग्रॅम किती वाढ ?

२४ कॅरेट - १५७७५ रूपये - १९७ रूपयांची वाढ

२२ कॅरेट - १४४६० रूपये - १८० रूपयांची वाढ

१८ कॅरेट - ११८३१ रूपये - १४७ रूपयांची वाढ

सोन्याचे दर का वाढले ?

जागतिक बाजारात डॉलरची किमत घसरले अथवा अमेरिका आणि इतर देशांमध्ये आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करतात. त्याशिवाय शेअर बाजारातील चढउतार आणि वाढती महागाई यामुळे सोन्याची गुंतवणूक वाढते. लग्न आणि सणांच्या हंगामात वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारातही किमती वाढतात. आयात शुल्क आणि रुपयाची घसरती किंमतीमुळेही सोन्याचे दर वाढतात.

सोन्याच्या भाववाढीमुळे रोज गोल्ड ठरतोय ग्राहकांसाठी पर्याय

सोन्या चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांना मौल्यवान अशी भेट काय द्यावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण सोन्याच्या वाढत्या भावामुळे अनेकजण आता 22 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यान ऐवजी रोज गोल्ड च्या दागिन्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ही आकर्षक असे रोज गोल्डचे दागिने दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Bhujia Sev Recipe: कुरकुरीत आणि चटपटीत; आलू भुजिया शेवची ही सिक्रेट रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

Viral bike video: एक, दोन नाही तर बाईकवर बसले तब्बल ९ जणं; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Coconut Kharvas Recipe: घरी बनवा ओल्या नारळाचा खरवस; तोंडात टाकताच विरघळेल; रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT