GOLD PRICE FALLS BY ₹22,400 SILVER DROPS SHARPLY IN INDIA Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

India Gold Silver Rate Today News : राज्यात पेट्रोल-डिझेल महागाईदरम्यान सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं २२,४०० रुपयांनी तर चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली असून लग्नसराईत खरेदीदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Alisha Khedekar

  • सोन्याचे दर २२,४०० रुपयांनी घसरले

  • चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली

  • लग्नसराईत खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

  • बाजारातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांची चिंता वाढलेली असतानाच सोने-चांदीच्या किमतीत झालेली मोठी घसरण दिलासादायक ठरत आहे. लग्नसराईच्या हंगामात खरेदीदारांसाठी ही संधी सुवर्णसंधी मानली जात आहे. सोन्याचे दर तब्बल २२,४०० रुपयांनी कमी झाले असून चांदीही १०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र, बाजारातील या सतत बदलणाऱ्या दरांमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम: २२४ रुपयांनी स्वस्त

८ ग्रॅम: १,७९२ रुपयांनी स्वस्त

१० ग्रॅम: २,२४० रुपयांनी स्वस्त

१०० ग्रॅम: २२,४०० रुपयांनी स्वस्त

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम: २०५ रुपयांनी स्वस्त

८ ग्रॅम: १,६४० रुपयांनी स्वस्त

१० ग्रॅम: २,०५० रुपयांनी स्वस्त

१०० ग्रॅम: २०,५०० रुपयांनी स्वस्त

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate )

१ ग्रॅम: १६८ रुपयांनी स्वस्त

८ ग्रॅम: १,३४४ रुपयांनी स्वस्त

१० ग्रॅम: १,६८०रुपयांनी स्वस्त

१०० ग्रॅम: १६,८०० रुपयांनी स्वस्त

चांदीचे आजचे दर (Silver Rate Today)

चांदीच्या दरात देखील लक्षणीय घसरण झाली आहे. १० ग्रॅम चांदी १०० रुपयांनी, १०० ग्रॅम चांदी १००० रुपयांनी, तर १००० ग्रॅम चांदी १०,००० रुपयांनी घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडी आणि आर्थिक परिस्थितीमुळे हे चढ-उतार होत असून पुढील काही दिवसांत दर आणखी बदलू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT