Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold - Silver Price Today: सोन्याच्या दरामध्ये सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा ताजे दर किती?

Priya More
  • सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • आजचा २४ कॅरेटचे १ तोला सोनं १४७० रुपयांनी स्वस्त झालं

  • १० तोळे सोन्याच्या दरात १४,७०० रुपयांची घसरण

  • आज १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दरही घसरले

  • चांदीच्या दरात आज काहीच बदल झाला नाही

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. सोनं-चांदीचे दर कमी होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी सराफा बाजारामध्ये मोठी गर्दी केली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १४७० रुपयांनी घसरण झाली. तर आज चांदीच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे ताजे १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात आजही मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,५६,७७० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १४,७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १५,६७,७०० रुपये खर्च करावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,३५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४३,७०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,३७,५०० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे तयार केले जातात. २२ कॅरेटच्या सोन्याचे दर घसरल्यामुळे आज खरेदीची चांगली संधी आहे.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ८३० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१७,८५० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,३०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,७८,५०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी मोठी घसरण झाली असली तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २५५ रुपये द्यावे लागतील. तर १ किलो चांदी खरेदीसाठी २,५५,००० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT