सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आज काहीशी दिलासादायक बातमी आहे. सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी सण तसेच लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज १ तोळे म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ५७० रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या दरातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, चांदीच्या दरातही सध्या कोणताही विशेष बदल झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव २३ हजार ५०० रुपये इतका स्थिर आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराई जवळ येत असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर स्थिर राहिल्यामुळे आगामी काळात ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि मागणी यानुसार सोन्याच्या दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,९५७
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१९,६५६
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४९,५७०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,९५,७००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,७१०
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०९,६८०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३७,१००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,७१,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,२१८
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८९,७४४
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१२,१८०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,२१,८००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.