Gold Rate Today News AI Image
बिझनेस

Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! १ तोळे इतक्या रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या 24k, 22k,18k चे ताजे दर

Gold Silver Rate Today News : आजच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १ तोळे सोने १,१०० रुपयांनी स्वस्त झाले असून २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर येथे जाणून घ्या.

Alisha Khedekar

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आज दिलासादायक बातमी आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज १ तोळे सोन्याचा भाव तब्बल १,१०० रुपयांनी कमी झाला असून, तो आता १,४९,१८० रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर १० तोळे सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. १० तोळे सोने आज तब्बल ११,००० रुपयांनी स्वस्त झाले असून, त्याची किंमत १४,९१,८०० रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, चांदीच्या दरात सध्या विशेष बदल झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव २,३५,००० रुपये इतका आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे बाजारातील खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,९१८

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१९,३४४

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४९,१८०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,९१,८००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,६७५

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०९,४००

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३६,७५०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,६७,५००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,१८९

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८९,५१२

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,११,८९०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,१८,९००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Duck Walk Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी करा डक वाॅक, २१ दिवसात दिसेल फरक

Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Crab Fact : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Navratri Colours 2026: देवीची 9 रूपं आणि 9 शुभ रंग, यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा?

SCROLL FOR NEXT