दिवाळीला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सणाच्या निमित्ताने अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आज सराफा बाजार सुरू होताच सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत होते. मात्र, आज सोन्याच्या दरात प्रति तोळा २७० रुपयांची वाढ झाली आहे.
आज १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ३९ हजार ६४० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता अधिक भार पडणार आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा दर स्थिर असून १०० ग्रॅम चांदीची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे की दर कमी होण्याची वाट पाहायची, असा प्रश्न अनेक ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,९६४
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,११,७१२
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३९,६४०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,९६,४००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,८००
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०२,४००
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२८,०००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,८०,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,४७३
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८३,७८४
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०४,७३०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,४७,३००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.