Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! १० तोळा सोन्याच्या दरात १६००० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Today Gold Rate Hike: आज सोन्याचे दर वाढले आहेत. गेल्या ४ दिवसांपासून सोन्याचे दर सलग वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दरात दीड हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर आजही वाढले

प्रति तोळ्यामागे १६४० रुपयांची वाढ

सोन्याचे दर १ लाखांच्या पार

गणेशोत्सवाच्या काळात गेल्या ४ दिवसांपासून सतत सोन्याचे दर वाढत आहेत. गणेश चतुर्थीपासून रोज सोन्याचे भाव वाढत आहेत. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. सोन्याचे आज आजदेखील प्रति तोळ्यामागे १,६४० रुपयांनी वाढले आहेत. काल हे दर किंचिंत वाढले होते. काल सोन्याचे दर फक्त दहा रुपयांनी वाढले होते. आज हे दर दीड हजारांनी वाढले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आजच २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,६४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज १ तोळा सोन्याचे दर १,०४,९५० रुपये आहेत. ८ तोळा सोन्याचे जर १,३१२ रुपयांनी वाढले असून ८३,९६० रुपये झाले आहेत. दरम्यान १० तोश्यामागे १६४०० रुपयांची वाढ झाली आहे.आज गेल्या ४ दिवसांपासून सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोनं (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ९६,२०० रुपये झाले आहे. या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅममागे १२०० रुपयांनी वाढ होऊन हे दर ७६,९६० रुपये झाले आहेत. १० तोळ्याचे दर ९,६२,००० रुपये आहेत. या दरात १५००० रुपयांची वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,२३० रुपयांनी वाढले आहेत. आज १ तोळा सानं ७८,७१० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६२,९६८ रुपये झाले आहेत. या दरात ९८४ रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळ्याचे दर ७,८७,१०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT