Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २४ कॅरेटचे आजचे दर

Today Gold Rate Fall: आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १० तोळ्यामागे १००० रुपयांपेक्षा जास्त रुपयांनी घसरण झाली आहे.

Siddhi Hande

सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. सणासुदीच्या काळात सोने खरेदी केलेले चांगले असतात, असं म्हटलं जातं. परंतु सध्या सोन्याने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्नच सर्वसामान्यांना पडलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर कमी झाले आहे. प्रति तोळ्यामागे ११० रुपयांनी घसरण झाली आहे.

सोन्याचे दर गेल्या महिन्याभरापासून १ लाखांपेक्षा जास्त आहेत.मागील आठवड्याभरात सोन्याचे दर सर्वाधिक वाढले आहेत. आज जरी सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरीही ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही आहेत. आज सोन्याचे दर १,११,१७० रुपये प्रति तोळा आहेत.

आजचे सोन्याचे दर

आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर १,११,१७० रुपये आहेत. दर ८ग्रॅम सोन्याचे भाव ८८,९३६ रुपये आहेत. १० तोळ्यामागे सोन्याच्या दरात १,१०० रुपयांची घट झाली आहे. हे दर ११,११,७०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,०१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ८० रुपयांची घसरण होऊन हे दर ८१,५२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १००० रुपयांनी घसरले असून हे दर १०,१९,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोनंदेखील स्वस्त झालं आहे. १० ग्रॅममागे ९० रुपयांनी घट झाली आहे. हे दर ८३,३७० रुपये आहेत. १० तोळ्यामागे ९०० रुपयांची घसरण झाली असून हे दर ८,३३,७०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT