Gold Silver Rate Today News  AI Image
बिझनेस

Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळा ५१२० रुपयांनी स्वस्त; वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Rate Today News : सोन्याच्या दरात सलग आठव्या दिवशी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं तोळ्यामागे ५,१२० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीचे दरही कमी झाले आहेत.

Alisha Khedekar

Gold Rate Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. आजही सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी मिळत आहे. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. अशा वेळी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं तब्बल ५ हजार १२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख २५ हजार ५७० रुपये झाला आहे. केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. १०० ग्रॅम चांदीच्या किमतीत ५०० रुपयांची घसरण झाली आहे.आज चांदीची किंमत १०० ग्रॅमप्रमाणे १७५०० इतकी आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सोन्या-चांदीच्या दरांवर लागले आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,५५७

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,००,४५६

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२५,५७०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,५५,७००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५१०

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,०८०

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१५,१००

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,५१,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४१८

  • ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,३४४

  • १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,१८०

  • १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४१,८००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे ६ डिसेंबरला दिल्लीला जाणार

Marriage Age Gap : सुखी संसारासाठी नवरा - बायकोचं वय किती असावं?

Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात, राहुल गांधींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

वजन कमी करण्यासाठी व्यायाम कधी करावा? सकाळ की संध्याकाळ, योग्य वेळ जाणून घ्या

Diabetes : डायबिटीज होईल कंट्रोल, रोजची फक्त १५ मिनिटांची 'ही' सवय लावून घ्या; औषध न घेता रक्तातील साखर होऊ शकते कमी

SCROLL FOR NEXT