Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात, राहुल गांधींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Political News: राहुल गांधी यांनी भाजपबाबत मोठा दावा केला. भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने राजकारणात खळबळ उडाली.
Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात, राहुल गांधींच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Rahul GandhSaam Tv
Published On: 

भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली. राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिकागो विद्यापीठात एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मोदी सरकारमधील नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. पुढच्या ८ महिन्यात याचे परिणाम दिसून येतील, असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमोर राजकीय भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचना कोलमडल्याचा दावा केला. त्याचसोबत मोदी सरकारमधील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचोसबत, हे सर्व मंत्री विरोधकांना सरकारमधील घडामोडींची माहिती देत आहेत. आता पुढच्या ८ महिन्यात याचा राजकीय परिस्थितीवर परिणाम होईल, असा खळबळजनक दावा देखील राहुल गांधींनी केला. राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर भाजपचे हे मंत्री कोण आहेत? यावर चर्चा होऊ लागली आहे.

अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावर सातत्याने निशाणा साधत आहेत. राहुल गांधींनी सांगितले की, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकारीच आता दबावाला कंटाळले असून ते विरोधी पक्षांना आतली माहिती देत ​​आहेत. शिकागो विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक रॉबर्ट पेप यांच्याशी झालेल्या संभाषणात राहुल गांधींनी हे विधान केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सर्व अनियमितता आणि नुकसान होऊनही विरोधी पक्ष निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नाही कारण असे केल्याने लोकशाही रचना पूर्णपणे नष्ट होईल.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, त्यांना निवडणूक आयोगाच्या आतूनच माहिती मिळत आहे. आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आत म्हणत आहेत की, ते यापुढे असे चालू ठेवू शकत नाहीत आणि ही संपूर्ण व्यवस्था कोसळणे ही केवळ काळाची बाब आहे. १०० टक्के पुराव्याशिवाय ते लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. निवडणुकीतील अनियमितता जनतेच्या निदर्शनास आणून देणे आणि जोपर्यंत नागरिकांना स्वतःला संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत सतत चर्चा सुरू ठेवणे, ही विरोधी पक्षांची रणनीती आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.