Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि वॉकिंग हे व्यायाम केले जातात. शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.
परंतु, अनेक संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की तुम्ही केवळ व्यायाम करता हे महत्वाचे नाही तर यासोबतच तुम्ही व्यायाम कोणत्या वेळी करता, याचाही देखील शरीरावर परिणाम दिसून येतो.
सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे शरीरात कोणते बदल होतात ते जाणून घ्या
सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील साठलेली चरबी कमी करण्यास फायदा होऊ शकतो. सकाळी ७ ते ९ या दरम्यान नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दिवसभराच्या कामामुळे संध्याकाळी शरीराचे तापमान किंचित जास्त असते आणि स्नायूंचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे चालते. त्यामुळे संध्याकाळी व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो.
दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी व्यायाम केल्याने मानसिक तणाव कमी होण्यास आणि मनःस्थिती सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.