Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: सोन्याचे दर १०,००० रुपयांनी वाढले; ग्राहकांच्या खिशाला फटका; १० तोळ्याचे भाव किती?

Today Gold Rate 23rd August 2025: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे १०९० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्याने सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

Siddhi Hande

आज सोन्याचे दर वाढले

आज सोन्याचे दर १० तोळ्यामागे १०,००० रुपयांनी वाढले

ऐन गणेशोत्सवात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आठवड्याभरात गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात.परंतु आता सोन्याचे दर वाढल्याने सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे १,०९० रुपयांनी वाढले आहेत.

सोन्याच्या दरात वाढ (Gold Rate Hike)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०९० रुपयांनी वाढले आहे. आज प्रति तोळा सोन्याचे दर १,०१,६२० रुपये आहेत. काल हे दर १,००,५३० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,२९६ रुपये आहे. या दरात ८७२ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०,१६,२०० रुपये आहेत. या दरात १०,९०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज हे दर ९३,१५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ७४,५२० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,००० रुपयांनी वाढून ९,३१,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७६,२१४ रुपये आहेत. या दरात ८१४ रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,९७१ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ८,१४० रुपयांनी वाढून ७,६२,१४० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मंगळवार ५ राशींसाठी भाग्याचा; कामात बढतीचे योग; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Avika Gor: 'बालिका वधू'मधील लाडो लवकरच अडकणार विवाहबंधनात, अविकाच्या हातावर रंगली मेहंदी, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: - सीना नदीला पुर आला अन् दिडशे लोकांची वस्ती पुर्णपणे पाण्याखाली गेली

Maharashtra HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य परीक्षा मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT