सोन्याचे दर घसरले
१० तोळ्यामागे १५००० रुपयांची घसरण
लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा
सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहे. काल सोन्याचे दर वाढले होते मात्र आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे १५२० रुपयांनी घसरले आहेत. लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर आज जरी कमी झाले असले तरी ते १,३३,८६० रुपये आहेत. त्यामुळे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे हे दर अजून कमी करण्याची मागणी केली जात आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.
२४ कॅरेचे दर (24k Gold Rate)
आज १ तोळ्यामागे १,५२० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३३,८६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १,२१६ रुपयांची घसरण झाली असून हे दर १,०७,०८८ रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,२०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १३,३८,६०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४०० रुपये झाले आहेत. हे दर १,२२,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१२० रुपयांनी घसरले असून ९८,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १४००० रुपयांनी घसरले असून १२,२७,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,१५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,००,३९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ९२० रुपयांची घसरण झाली असून हे दर ८०,३१२ रुपये झाले आहेत. तर १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची घसरण झाली असून दर १०,०३,९०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.