Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले, चांदीला उतरती कळा; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा

Gold Rate Today 13th December 2025: सोने चांदीचे दर आज घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६००० रुपयांनी घसरले आहेत.

Siddhi Hande

सोने-चांदीचे दर घसरले

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

लग्नसराई सोने-चांदीला उतरती कळा

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसात सातत्याने सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत होते. आज मात्र सोन्याच्या किंमती घसरल्या आहे.ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याला उतरती कळा लागल्याने ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे.

सोन्याचे दर कितीने घसरले? (Gold Price Fall Today)

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २७० रुपयांनी घसरले आहेत. १४ कॅरेट १० तोळा सोन्याच्या दरात २७०० रुपयांची घसरण झाली आहे. १ तोळ्यामागे ग्राहकांना १,३३,९१० रुपये मोजावे लागणार आहे तर १० तोळ्याचे दर १३,३९,१०० रुपये झाले आहे. २२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे. यामध्ये प्रति तोळ्यामागे २५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,२२,७५० रुपये झाले आहेत. १० तोळ्याचे दर २,५०० रुपयांनी घसरले असून सध्या १२,२७,५०० रुपयांवर विकले जात आहे.

चांदीलाही उतरती कळा (Silver Rate Today)

चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. काल चांदीचे दर इतिहासात पहिल्यांदाच २ लाखांपेक्षा जास्त होते. आता या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे. चांदीचे दर काल २,०४,००० रुपये होते. हेच दर आज १,९८,००० रुपये झाले आहेत.

सोने आणि चांदी दोन्हीचेही दर घसरल्याने आज दागिने खरेदी करायची योग्य वेळ असल्याचे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, हे दर कमी झाले असले तरीही अजून १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत. हे दर अजून कमी करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्याची चूक किडनीसाठी ठरू शकते महागात; कशी घ्याल स्वतःची काळजी?

विद्यार्थ्यांना शिक्षा कराल तर खबरदार! शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवी नियमावली जारी

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुका जाहीर होताच भाजपचा शरद पवार गटाला 'दे धक्का'

लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा धुडगूस; नवरदेवाच्या वडिलांचं अपहरण, एकाला जबर मारहाण करून लुटलं

Bombay Masala Sandwich Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बॉम्बे मसाला सँडविच, वाचा झटपट होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT