Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दराने उच्चांक गाठला! १० तोळ्यामागे १२००० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Gold Rate Today 10th October 2025: ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,२३,००० रुपयांवर विकले जात आहे.

Siddhi Hande

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहे. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात लग्नाचे मूहूर्त आहेत. लग्नकार्य म्हटल्यावर सोने-चांदीची खरेदी ही असते. सोन्याचे दागिने बनवले जातात. परंतु सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. आज मात्र, सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढले आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर खूप वाढल्याने खरेदीदरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर कमी झाले होते. परंतु आता पुन्हा सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. १ तोळ्यामागे सोन्यासाठी १,२३,००० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९६० रुपयांनी वाढले असून ते ९८,५७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १२,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १२,३२,२०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर सध्या १,१२,९५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्यामागे ८८० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९०,३६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ११००० रुपयांची वाढ झाली असून हे दर ११,२९,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ९२,४२० आहेत. ८ ग्रॅममागे ७२० रुपयांची वाढ झाली असून हे दर ७३,९३६ झाले आहेत. १० तोळ्यामागे ९००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ९,२४,२०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT