Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: १ तोळे सोन्यासाठी ९८,१७० रुपये मोजावे लागणार; २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर काय?

Today Gold Rate 10th July 2025: आज सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात आज फार बदल झालेले नाहीत. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर.

Siddhi Hande

सोन्याच्या भावात सतत चढ-उतार सुरु आहे. सोन्याचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात. त्यामुळे सोनं कधी खरेदी करावं हा प्रश्न ग्राहकांना पडलेला असतो. त्यात आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकजण चांगला मूहूर्त साधत सोने खरेदी करतात. रोज सोन्याच्या दरात बदल होत असतात. आज सोन्याच्या दरात फार काही बदल झालेला नाही. सोन्याचे दर जैसे थे वैसे आहेत.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे फक्त १० रुपयांनी घसरले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९८,१७० रुपये आहेत. काल हेच दर ९८,१८० रुपये होते. आज १०० ग्रॅम सोन्यामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,५३६ रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील १० रुपयांनीच घसरण झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर ८९,९९० रुपये आहेत. काल हे दर ९०,००० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ७१,९९२ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. प्रति तोळ्यामागे १० रुपयांनी घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याचे दर ७३,६३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,९०४ रुपये आहेत.

सोनं खरेदी करणे ही एक गुंतवणूकच आहे. सोन्याचे दर आजपर्यंत फक्त वाढतच गेले आहेत. इथून पुढेही अनेक वर्ष सोन्याचे भाव वाढतच जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही आज सोने खरेदी केले तर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. परंतु सध्या सोन्याचे दर लाखांवर गेले आहेत त्यामुळे हेदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT