Today Gold Rate: खुशखबर! महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा आजचे भाव

Today Gold Rate Fall: आज जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

सोन्याच्या भावाला पुन्हा उतरती कळा लागली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे भाव गगनाला भिडले होते. आता हे दर पुन्हा कमी व्हायला लागले आहेत. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Gold Rate Today
EPFO चा मोठा निर्णय! आता चेहरा दाखवा अन् UAN नंबर जनरेट करा

सोन्याचे दर एका आठवड्यापूर्वी १ लाखांपेक्षा जास्त होते. त्यानंतर हे भाव कमी होत गेले. आज सोन्याचे दर प्रति तोळा ९७,२६० रुपये आहे. हे दर १ लाखांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे.

सोन्याचे आजचे दर (Gold Rate Today)

२४ कॅरेट (24K Gold Rate)

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १६० रुपयांनी घट झाली आहे. आज सोन्याचे दर ९७,२६० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट झाली आहे. आजचे दर ७७,८०८ रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १६०० रुपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,७२,६०० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज १ तोळा सोन्याची किंमत ८९,१५० रुपये आहे. या किंमतीत १५० रुपयांनी कपात झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,३२० रुपये आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी कपात झाली आहे. हे दर आज ८,९१,५०० रुपये आहेत.

Gold Rate Today
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

१८ कॅरेट (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७२,९४० रुपये आहेत. या दरात १३० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,३५२ रुपये आहे. १० तोळा सोन्याच्या दरात १३०० रुपयांनी घट झाली. हे दर ७,२९,४०० रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरातही थोडी घट झाली आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८६१.६० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,०७७ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७७० रुपये आहेत.

Gold Rate Today
Gold Price: सोनं आजही स्वस्त झालं, १० तोळं सोन्याच्या किंमतीत ५५०० रूपयांनी घसरण; वाचा आजचा दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com