Gold Silver Price Drop meta ai
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, 10 तोळा 32200 रुपयांनी स्वस्त; वाचा 18- 22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold Silver Price Drop: सोनं-चांदी खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात ३२२०० रुपयांची घसरण झाली. तर चांदी देखील आज स्वस्त झाली आहे.

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. दोन दिवस सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीचे बदलेले दर पाहून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज १ तोळो सोनं ३२२० रुपयांनी स्वस्त झालं. तर १ तोळा चांदीच्या दरात १०००० रुपयांची घसरण झाली. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आजचे सोनं-चांदीचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२२० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२४,५८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,४५,८०० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही हे सोनं खरेदी करू शकता.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २९५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,२०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २९,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४२,५०० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही हे सोनं आज खरेदी करू शकता.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २,४१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९३,४४० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २४,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,३४,४०० रुपये खर्च करावे लागतील.

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी १० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी १६५ रुपयांना विकली जात आहे. आज १ किलो चांदी १०००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,६५,००० रुपये खर्च करावे लागतील. आज तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Knee Joint Pain: गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करू नका! वेळीच उपचार न घेतल्यास चालणं-फिरणंही होऊ शकतं कठीण

Government Job: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

७२ व्या मजल्यावर बोलावलं अन् ५ कोटींची लाच मागितली; मंत्री संजय शिरसाटांवर राऊतांचा खळबळजनक आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना...

Microwave Cleaning : मायक्रोवेव्ह आतून चिकट अन् तेलकट झालाय? फक्त ५ रुपयांची 'ही' ट्रिक वापरून नव्यासारखा चमकेल

Maharashtra News Live Update: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडयूकेअर फार्मास्युटिकलचा परवाना रद्‌द

SCROLL FOR NEXT