नवीन वर्षात सोन्याचे दर वाढणार
२०२६ मध्ये सोन्याचे दर प्रति औंस ५००० डॉलर होण्याची शक्यता
भारतात सोन्याचे दर १,५७,००० रुपयांवर पोहचतील
सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर सध्या सव्वा लाखांच्या पार गेले आहेत. या दरांमध्ये आता अजून वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत बँक ऑफ अमेरिकेने दावा केला आहे. पुढच्या वर्षी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
बँक ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, २०२६ मध्ये सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस ४,५३८ डॉलर होण्याची शक्यता आहे. परंतु जर सध्याची परिस्थिती आणि सुरक्षित गुंतवणूक या दृष्टीने मागणी कायम राहिली तर किंमत प्रति औंस ५००० डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
भारतात सोन्याचे दर प्रति तोळा १,५७,००० रुपये होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंस ४,१७५ डॉलर्सच्या घरात आहे.
भारतीय बाजारात सोन्याचे दर किती? (Gold Rate)
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,२५,३४२ रुपये आहेत.
बँक ऑफ अमेरिकेने सूचित केले आहे की, सध्या सोन्याची स्थिती जास्त खरेदी केलेले (Over Brought) आणि कमी गुंतवणूक (Under Investment) केलेले अशा दोन्ही स्थितींमध्ये आहे. या दोन्ही स्थितींमध्ये सोने मात्र खरेदी केले जात आहे.
सोन्याचे दर का वाढणार? (Why Gold Rate Hike In 2026)
बँक ऑफ अमेरिकेने अंदाज वर्तवलाय की, सरकारी कर्जाची पातळी वाढणे, महागाई, कमी व्याजदर आणि सोन्याच्या दरात तेजी, अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा परिणाम यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात. पुढच्या वर्षात सोन्याचे दर प्रति औंस ५००० डॉलर होऊ शकतो.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील मागणीत घट, खाणकाम धातू पुरवण्यासाठी अडचणी तसेच जागतिक पातळीवर सोन्याचा कमी साठा याचाही परिणाम सोन्याच्या किंमतीवर होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.