Road Accident Prediction Device: चालकाला डुलकी आली तरी नाही होणार दुर्घटना; ब्रेक लावून कारही थांबेल

AI-Based Road Accident Prediction Device: डॉ. नवदीप मोर यांनी नवीन रोड अॅक्सिडेंट प्रेडिक्शन डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाइस अपघातांना प्रतिबंधित करण्यास उपयुक्त आहे. चालक झोपी गेल्यावर अलर्ट देते, ज्यामुळे जास्तीत जास्त रस्ता सुरक्षितता सुनिश्चित होते.
AI-Based Road Accident Prediction Device
Road Accident Prediction Device the breakthrough technology that alerts and stops cars automatically when drivers fall asleep.saam tv
Published On
Summary
  • चालक झोपल्यास हे उपकरण अलर्ट देत वाहन थांबवतं.

  • या यंत्रामुळे रस्ते अपघातांमध्ये घट होण्याची शक्यता.

  • हे तंत्रज्ञान भारतातील रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी क्रांती ठरणार आहे.

जेव्हा विज्ञान आणि मानवता हे एका लक्ष्याला मिळवण्यासाठी एकत्र कामगिरी करत असतात, तेव्हा एक तंत्रज्ञानाचा जन्म होत असतो. जे मानवाचं संरक्षण करण्यास फायदेशीर ठरत असतं. असाच एक चमत्कार घडला असून त्यातून रस्ते अपघाताला आळा बसण्याची शक्यता आहे. आपण नेहमी अपघाताच्या बातम्या वाचतो. चालकाला झोप लागल्यानं वाहनाची दुर्घटना झाल्याची घटना वारंवार घडत असतात. पण विज्ञानाच्या एका चमत्कारिक उपकरणामुळे चालकाला वाहन चालवताना झोप आली तर अपघात होण्यापासून बचाव होऊ शकतो.

गुरू जंभेश्वर विज्ञान आणि प्रौद्योगिक विश्वविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टेंट प्रोफेसर आणि ट्रॅफिक इंटर प्रिटेशन सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.नवदीप मोर यांनी हे उपकरण बनवलंय. हे यंत्र रस्ते अपघात रोखण्यास मदत करेल. वाहन चालकाला झोप आली तरी हे यंत्र उपकरण लगेचच अलर्ट देईल आणि अपघात होण्यापासून वाचवेल. या यंत्राचे नाव रोड अॅक्सिडेंट प्रेडिक्शन डिव्हाइस आहे.

AI-Based Road Accident Prediction Device
Vijay Deverakonda: रश्मिकासोबत साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडाचा भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर

कसे काम करेल डिव्हाइस?

या उपकरणाचे सेन्सर्स ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील बदलत्या हावभावांवरून त्याला झोप लागल्याचं ओळखतील. डॉ. मोर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि मशीन लर्निंग वापरून हे उपकरण विकसित केलं. याला "रोड अॅक्सिडेंट प्रेडिक्शन डिव्हाइस" असे नाव देण्यात आलंय. भारत सरकारच्या पेटंट ऑफिसने या नावाने पेटंट मंजूर केलंय.

AI-Based Road Accident Prediction Device
Road Cum Rail Tunnel Project: भन्नाट! एकाच बोगद्यातून धावणार कार, बस अन् रेल्वे; 'या' 3 ठिकाणी होणारे नवे महामार्ग

रोड अॅक्सिडेंट प्रेडिक्शन डिव्हाइस स्टेअरिंगच्या जवळ बसले जाते. यात तीन सेन्सर असतात. पहिला सेन्सर हा चालकाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन म्हणजेच हावभाव नियंत्रित करते. यामुळे थकवा किंवा झोप लागत असल्याचं संकेट मिळत असतात. दुसरा सेन्सर हे रस्त्याच्या लेनवरील स्थितीवर नजर ठेवत असते. तर तिसरे सेन्सर वातावरणाची स्थिती जसे की, दव, किंवा पावसाची माहिती देत असते.

जेव्हा हे तिसरे सेन्सर कोणत्या धोक्याचे संकेत देते, तेव्हा हे उपकरण डिव्हाइस सक्रिय होते. यामुळे स्टेअरिंगमध्ये कंपन होत असते. यामुळे चालक जागरुक करत असतो. हॉर्न वाजू लागतात, जेणेकरून वाहन चालक जागरुक होत असतो. तरी चालकाने वाहन थांबवलं नाही, तर हे उपकरण वाहनाची गती कमी करते, आणि ब्रेक लावत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com