२४ कॅरेट सोन्याचा दर १,५१,१४० रुपयांवर पोचला
चांदीच्या दरात आठवडाभरात १५,६९८ रुपयांची मोठी वाढ झाली
लग्नसराईमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेही सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी
India Gold Silver Rate Today News देशभरात सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीमुळे सराफा बाजारात खरेदीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. जाणून घ्या आठवड्याभरात किती होता सोन्याचा दर?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम तब्बल १,५१,१४० रुपयांवर पोचला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल ३,५८३ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली असून प्रति किलो चांदीचा दर २,५५,२०० रुपयांवर गेला आहे. आठवडाभरात चांदीच्या दरात १५,६९८ रुपयांची वाढ झाली आहे.
८ मे रोजी २३ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५०,५३५ रुपये होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३८,४४४ रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर १,१३,३५५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ८८,४१७ रुपये नोंदवला गेला. याआधी ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,५५७ रुपये होता.
तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारातील वाढती मागणी. सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिका आणि इराण यांच्यातील करारामुळे जागतिक बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.