Gold Price Today x
बिझनेस

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

Today Gold Price : नवरात्रोत्सव, दसरा अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते. पण त्याआधीच सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ

  • सोन्यासह चांदीच्या किंमतीही झाली वाढ

  • खरेदीकर्त्यांच्या खिशाला बसणार फटका

Gold Price : अमेरिकन फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतर मागणी आणि अमेरिकन डॉलरमुळे शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा ऑक्टोबर सोन्याचा फ्युचर्स ०.४३ टक्क्यांनी वाढून १,०९,५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर एमसीएक्स चांदीचा डिसेंबर फ्युचर्स १.३१ टक्क्यांनी वाढून १,२८,८०२ रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात, डॉलर निर्देशांकात जोरदार वाढ आणि यूएस १०-वर्षीय बाँड उत्पन्नानंतर नफा बुकिंगमुळे एमसीएक्स सोन्याचा ऑक्टोबर फ्युचर्स करार ०.७० टक्क्यांनी घसरून १,०९,०५२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​गेला.

Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, एमसीएक्सवरील सोन्याच्या ३ ऑक्टोबरच्या कराराचा दर ०.४६% म्हणजेच ४९८ रुपयांनी वाढून ₹१,०९,५५० प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. त्याच वेळी, चांदीच्या ५ डिसेंबरच्या कराराचा दर १.२१% म्हणजेच १,५३७ रुपयांनी वाढून ₹१,२८,६६९ प्रति किलोवर गेला आहे.

आजच्या (१९ सप्टेंबर) व्यवहारात सोन्याने दिवसातील उच्चांक ₹१,०९,६७८ प्रति १० ग्रॅम गाठला, तर नीचांकी स्तर ₹१,०९,१५८ प्रति १० ग्रॅम होता. चांदीच्या दराने मात्र दिवसातील उच्चांक ₹१,२८,९४५ प्रति किलो आणि नीचांकी स्तर ₹१,२७,५०० प्रति किलो असा प्रवास केला.

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,२०५ रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८१,६४० रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,०२,०५० रुपये इतकी आहे.

  • २२ कॅरेट १००० ग्रॅम सोन्याची किंमत १०,२०,५०० रुपये इतकी आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव?

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ११,१३३ रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ८९,०६४ रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १,११,३३० रुपये इतकी आहे.

  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ११,१३,३०० रुपये इतकी आहे.

गुड रिटर्न्सच्या मते, देशात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,१३३ रुपये होता. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १०,२०५ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ८,३५० होता. इंडियन बुलियन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, आज (१९ सप्टेंबर रोजी) २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०९,५३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,००,४०३ होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Rasta Roko : शासनाच्या १२८ कोटीच्या जीआरची होळी करत रास्ता रोको; हेक्टरी ३५ हजार देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट संजय राऊत विरोधात आक्रमक

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

SCROLL FOR NEXT