Gold-Silver Rate  Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : सोन्याला सोन्याचे दिवस... आज पुन्हा झळाळी, चांदीचा दर काय?

Gold-Silver Rate (24 September 2024) : सोन्याचा भाव गेल्या २ दिवसांपासून वाढत आहे. दिवाळी सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत. मात्र त्या आधीच सोन्याचा भाव गगणाला भिडलाय.

Ruchika Jadhav

सोने-चांदीच्या किंमती सलग तिसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सतत दर वाढत आहेत. आजही सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दर सतत वाढत असल्याने सोनं एक लाखांचा टप्पा पार करणार की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,०१,५०० रुपये आहे. १ तोळा सोन्याचा भाव ७०,१५० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,१२० रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,०१५ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,६५,१०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७६,५१० रुपये. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६१,२०८ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,६५१ रुपयांवर आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव काय?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,७४,००० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५७,४०० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४५,९२० रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७४० रुपये आहे.

मुंबई पुण्यासह अन्य शहरांतील दर माहितीये?

मुंबईमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार ६३६ रुपये आहे.

पुण्यात

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार ६३६ रुपये आहे.

नागपूर

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार ६३६ रुपये आहे.

नागपूर

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार ६३६ रुपये आहे.

अमरावती

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७ हजार ६३६ रुपये आहे.

चांदीचा आजचा भाव वाचा

चांदीचा आजच्या भाव बदललेला नाही. सलग दोन दिवसांपासून चांदीचा दर स्थिर आहे. चांदी प्रति किलो ९३, ००० रुपयांवर आहे. चांदीचा भाव आता आणखी वाढला तर काही दिवसांतच चांदी लाख रुपये किलो होण्याची शक्यता काही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi : शिर्डीत साईचरणी गुरुपौर्णिमा उत्साहात; 6 कोटी 31 लाखांचं दान | VIDEO

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT