Gold Silver Price Today: सोनं ७५ हजारांच्या पार, चांदीच्या दरातही मोठी उसळी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Silver Price 21st September 2024: गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या होत्या. मात्र, आत सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On

गेल्या अनेक महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे भाव महिन्याभरापूर्वी कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा सोन्याचे भाव ७५ हजारांच्या पार गेले आहेत. सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. येत्या १५ दिवसात नवरात्र सुरु होणार आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण आहेत. त्यामुळे अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असतील. मात्र, सोने चांदीच्या वाढत्या भावामुळे नागरिकांना मात्र फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोने-चांदीचे भाव.

Gold Silver Price
5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

या आठवड्यात पितृपक्षामुळे सोने-चांदीचे भाव घसरले होते. १७ सप्टेंबरला सोन्याच्या किंमत १५० रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर १९ सप्टेंबर रोजी २५० रुपये कमी झाल्या होत्या. मात्र, आज सोन्याचे भाव वाढलेले दिसत आहेत.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,१२० रुपये प्रति तोळा आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,५१२ रुपये आहे तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६०,०९६ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८,८६० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५५,०८८ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,८८६ रुपये आहे.

Gold Silver Price
Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

१८ कॅरेट सोन्याची किंमत

८ ग्रॅम सोने ४५,०७२ रुपयांनी विकले जात आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६,३४० रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत ५,६३४ रुपये आहे.

चांदीची किंमत

आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ७४०.८० रुपये आहे तर १० ग्रॅम चांदीची किंमत ९२६ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,२६० रुपये आहे. चांदीची किंमत आज १०० रुपयांनी वाढली आहे.

महाराष्ट्रातील सोन्याचे भाव

मुंबई

२२ कॅरेट सोने- ६८,८६० रुपये प्रति तोळा

२४ कॅरेट सोने-७५,१२० रुपये प्रति तोळा

पुणे

२२ कॅरेट सोने- ६८,८६० रुपये प्रति तोळा

२४ कॅरेट सोने-७५,१२० रुपये प्रति तोळा

नागपूर

२२ कॅरेट सोने- ६८,८६० रुपये प्रति तोळा

२४ कॅरेट सोने-७५,१२० रुपये प्रति तोळा

Gold Silver Price
NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com