Gold Rate Fall Saam tv
बिझनेस

Gold Rate Fall: धनत्रयोदशीपासून सोन्याचे दर घसरले, तब्बल ७६०० रूपयांनी झालं स्वस्त; वाचा सविस्तर

Gold Rate Fall From Diwali: दिवाळीपासूनच सोन्याच्या दरात चांगलीच घसरण होताना दिसत आहे. दिवाळीपासून आतापर्यंत सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले आहेत.

Siddhi Hande

देशात मागील एका आठवड्यापासून सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर कमी होत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीपासूनच सोन्याच्या किंमती कमी होत आहे. धनत्रयोदशी म्हणजे १८ ऑक्टोबरपासून सलग सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर आता १,२२,४६० रुपये झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचे दर घसरले आहे. अमेरिका-चीनमधील वाद, फेडरल बँकेच्या व्याजदराबाबत निर्णय, प्रॉफिट बुकिंग आणि डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. देशभरात सोन्याचे दर घसरले आहेत.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर (Gold Rate City Wise)

दिल्लीत सोन्याचे दर ११३१४० रुपये प्रति तोळा आहे. मुंबईत सोन्याचे दर ११२९९० रुपये आहेत.अहमदाबादमध्ये सोन्याचे दर ११३०४० रुपये आहेत. चेन्नईत ११२९९० रुपये तर कोलकत्यात ११२९९० रुपये आहेत. हैदराबादमध्ये सोन्याचे दर ११२९९० रुपये जयपुरमध्ये ११३१४० रुपये आहेत.सोन्याचे दर मागच्या आठवड्याभरात ७६०० रुपयांनी घसरले आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. यंदा दिवाळीत ग्राहकांनी चांगलीच सोने खरेदी केली आहे. धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि लक्ष्मी पूजनचा मूहूर्त साधत सोनं खरेदी केलं. परंतु सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरीही ते १ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. हे दर असेच कमी होत राहावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.

चांदीचे दर (Silver Rate)

सोन्यासोबतच चांदीचेही दर घसरले आहेत. चांदीचे दर आज १५४९०० रुपये प्रति किलो आहेत. परदेशात चांदीचे दर २.०३ टक्क्यांनी घसरले आहेत. याचाच परिणाम भारतातदेखील पाहायला मिळाला. भारतातदेखील १ किलो चांदीचे दर २०-३० हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT