Check Gold and Silver prices today (17 May 2024) in Mumbai, Pune and Major Cities Saam TV
बिझनेस

Gold Rate Fall Today: सोन्याचे दर जोरदार घसरले; दागिन्यांच्या दुकानात नागरिकांची तुफान गर्दी

18, 22 and 24K Gold Price Today on (17 May 2024): पुण्यात २४ कॅरेट सोनं ७,३७५ , २२ कॅरेट ६,७६० रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईतील दरामध्ये झालेल्या बदलानुसार आज मुंबईत २४ कॅरेट सोनं

Ruchika Jadhav

सोनं खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर फार वाढले होते त्यामुळे वाढत्या दरांना पाहून तुम्ही अद्याप दागिने बनवण्यास टाकले नसतील तर आज हे काम तुम्ही पूर्ण करू शकता. कारण सोन्याच्या किंमती गडगडल्यात.

जाणून घेऊ कितीने स्वस्त झालं सोनं

शुक्रवारी २२ कॅरेट सोनं २५० रुपयांनी घसरलं आहे. त्यामुळे ६७,७५० रुपये प्रति तोळाने सोन्याची विक्री होतेय. तर २४ कॅरेट सोन्याचे दर २७० रुपयांनी कमी होऊन आज सोनं ७३,९०० रुपये प्रति तोळा विकलं जात आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमती देखील २१० रुपयांनी खाली आल्यात. त्यामुळे आज १८ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ५५,४३० रुपये आहे.

मुख्य शहरांमधील किंमती वाचा

चेन्नईमध्ये २२ कॅरेट ६,७७० रुपये २४ कॅरेट सोनं ७,३८५ तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५४६ रुपये प्रति ग्राम आहे. नवी दिल्लीमध्ये १८ कॅरेट सोनं ५,५३१, २४ कॅरेट सोनं ७,३९० आणि २२ कॅरेट सोनं ६,७७५ रुपये प्रति ग्राम आहे. कोलकत्तामध्ये २२ कॅरेट ६,७६० रुपये २४ कॅरेट सोनं ७,३७५ तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति ग्राम आहे. हैदराबादमध्ये १८ कॅरेट सोनं ५,५३१, २४ कॅरेट सोनं ७,३७५ आणि २२ कॅरेट सोनं ६,७६० रुपये प्रति ग्राम आहे.

मुंबई पुण्यातील नवे दर

पुण्यात २४ कॅरेट सोनं ७,३७५ , २२ कॅरेट ६,७६० रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति ग्राम आहे. तर मुंबईतील दरामध्ये झालेल्या बदलानुसार आज मुंबईत २४ कॅरेट सोनं ७,३७५ , २२ कॅरेट ६,७६० रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५३१ रुपये प्रति ग्राम सारखीच किंमत आहे.

चांदीच्या दरात आज बदल झालेला नाही. कालच चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत ८९,१०० रुपये आहे. मुंबईत चांदी ९२,५०० रुपये आणि पु्ण्यात देखील ८९,१०० रुपये प्रति किलोने चांदी विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

SCROLL FOR NEXT