Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदीसाठी जाण्याआधी तपासा आजचे दर

Today's Gold Silver Price [15 May 2024]: मुंबईत आणि पुण्यात चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. मात्र दोन्ही शहरांच्या किंमती सारख्याच आहेत. ८७,६०० रुपये प्रति किलोने दोन्ही शहरांमध्ये चांदी विकली जातेय.
Gold Silver Today Price Hike: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदीसाठी जाण्याआधी तपासा आजचे दर
Today Gold Silver Price Hike 15 May 2024 in Mumbai, Pune, and in the Main Cities of MaharashtraSaam TV
Published On

गेल्या दोन दिवांत सोन्याच्या आणि चांदीच्या किंमती पडल्यानंतर आज दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य शहरांत देखील सोने आणि चांदीच्या किंमती वाढल्यात. त्यामुळे आज २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ. त्यासह चांदीचा प्रति किलो भाव काय आहे? ते देखील जाणून घेऊ.

Gold Silver Today Price Hike: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदीसाठी जाण्याआधी तपासा आजचे दर
Gold Prices Decline : सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरिकांची गर्दी, वाचा महाराष्ट्रातील आजचा भाव

आजचे सोन्याचे दर (Today's Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ४०० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे काल ६६,९०० रुपयांनी विकलं जाणारं सोनं आज ६७,३०० रुपये प्रति तोळाने मिळणार आहे. २४ कॅटेर सोन्याच्या किंमतीत ४३० रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे सोनं ७३,४०० रुपये तोळ्यावर पोहचलं आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमती ३२० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आज १८ कॅरेट सोनं प्रति तोळा ५५,०६० रुपये प्रति तोळा मिळत आहे.

मुंबई पुण्यातील सोन्याचे दर (Mumbai-Pune Gold Rate)

मुंबईत आज २२ कॅरेट सोनं ६७,१५० रुपये प्रति तोळा, २४ कॅरेट सोनं ७३,२५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५४,९४० रुपये प्रति तोळ्याने विकलं जात आहे. पुण्यात देखील २४ कॅरेट सोनं ७३,२५० रुपये प्रति तोळा, २२ कॅरेट सोनं ६७,१५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५४,९४० रुपये प्रति तोळा अशी सोन्याची किंमत आहे.

चांदीच्या किंमती (Today's Silver Rate)

सोन्यासह चांदीच्या दरात देखील वाढ झाली आगे. आज चांदीच्या किंमती ४०० रुपयांनी वाढल्यात. त्यामुळे प्रति किलो चांदीची किंमत ८७,६०० रुपये इतकी आहे.

मुंबई पुण्यातील चांदीच्या किंमती (Mumbai-Pune Silver Rate)

मुंबईत आणि पुण्यात चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. मात्र दोन्ही शहरांच्या किंमती सारख्याच आहेत. ८७,६०० रुपये प्रति किलोने दोन्ही शहरांमध्ये चांदी विकली जातेय. नवी दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, जयपूर, लखनौऊ, नागपूर आणि नोएडामध्ये देखील चांदी ८७,६०० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे.

Gold Silver Today Price Hike: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदीसाठी जाण्याआधी तपासा आजचे दर
Gold Smuggling : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 7.44 कोटींचं सोनं जप्त, अंतर्वस्त्रातून सर्वाधिक तस्करी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com