Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुढीपाडव्या आधी सोन्याने उच्चांक गाठला, सोनं १२००० रुपयांनी महागलं; वाचा आजचे २४ आणि २२ कॅरेटचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला. आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली

  • आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दराच वाढ झाली

  • सोने १.५८ लाखांच्या पार गेलं

  • चांदी दरात देखील मोठी वाढ झाली

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सराफा बाजारावर झाला आहे. आज युद्धाचा १७ वा दिवस आहे. या युद्धामुळे सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दराने मोठा उच्चांक गाठला. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची वाढ झाली. गुढीपाडव्या आधी सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज सोनं-चांदीचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १२०० रुपयांनी महाग झालं. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,५८,६२० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं आज १५,८६,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ११०० रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,४५,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,५४,००० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ९०० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१८,९७० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,००० रुपयांनी वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ११,८९,७०० रुपये खर्च करावे लागतील. गुढीपाडव्या आधी २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती?

मुंबई -

२४ कॅरेट - १५,८६२ रुपये

२२ कॅरेट - १४,५४० रुपये

१८ कॅरेट - ११,८९७ रुपये

पुणे -

२४ कॅरेट - १५,८६२ रुपये

२२ कॅरेट - १४,५४० रुपये

१८ कॅरेट - ११,८९७ रुपये

चेन्नई -

२४ कॅरेट - १५,९८२ रुपये

२२ कॅरेट - १४,९५० रुपये

१८ कॅरेट - १२,३३० रुपये

दिल्ली -

२४ कॅरेट - १५,८७७ रुपये

२२ कॅरेट - १४,५५५ रुपये

१८ कॅरेट - ११,९१२ रुपये

कोलकाता -

२४ कॅरेट - १५,८६२ रुपये

२२ कॅरेट - १४,५४० रुपये

१८ कॅरेट - ११,८९७ रुपये

अहमदाबाद -

२४ कॅरेट - १५,८६७ रुपये

२२ कॅरेट - १४,५४५ रुपये

१८ कॅरेट - ११,९०२ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

पैसे अपूर्ण मिळाले म्हणून 'खरेदीखत' अवैध ठरत का? मालकी हक्क कोणाचा असतो, सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय काय?

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

SCROLL FOR NEXT