gold  Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; ऐन लग्नसराईत ग्राहक हैराण, मुंबईसह तुमच्या शहरातील भाव काय?

Gold Rate update : सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक हैराण झाले आहेत .

Vishal Gangurde

आखाती देशात इराण-अमेरिकेने जाहीर केलेल्या शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय बाजार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबई,पुणे आणि दिल्लीतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर शनिवारी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्याे ग्राहक टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४९० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो २,६०,००० रुपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४९० रुपयांनी वाढल्याने भाव १,५२,८४० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,४०,१०० रुपयांवर पोहोचला आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा हा ११४,६३० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील सराफा बाजारात सलग दोन दिवस सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. ऐन लग्नसराईत सोन्याचा दर वाढल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांना जादा दर मोजावे लागणार आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर किती?

मुंबई - १,५२,८४० रुपये

पुणे - १,५२,८४० रुपये

नागपूर - १,५२,३६० रुपये

भिवंडी - १,५२,८७० रुपये

नाशिक - १,५२,८७० रुपये

दिल्ली - १,५२,९९० रुपये

चेन्नई - १,५३,८२० रुपये

हैदराबाद - १,५२,८४० रुपये

कोलकाता - १,५२,८४० रुपये

तत्पूर्वी, इराण-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिकेची आज युद्धाबाबत महत्वाची बैठक पाकिस्तानमध्ये आहे. दोन्ही देशातील वाद मिटल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. युद्धकाळात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू राहिल्यास सोन्याचे दर १ लाख ८० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT