Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं, १० तोळं सोन्यासाठी किती मोजावे लागणार? पाहा लेटेस्ट दर

Gold and Silver Prices Hit Record Highs in India: दिवाळीआधीच सोनं महागलं. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? पाहा आजचे दर.

Bhagyashree Kamble

  • दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ.

  • २४,२२ अन् १८ कॅरेट सोन्याच्या भावाला झळाली.

  • खरेदीदारांच्या खिशाला फटका.

दिवाळी या झगमगणाऱ्या आनंदाच्या सणाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. १८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरूवात होईल. दिवाळी हा सण जवळ आल्यानंतर आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. १० तोळं सोन्याच्या दरात १२,५०० रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की.

२४ कॅरेट सोनं

आज ७ ऑक्टोबर २०२५. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२२,०२० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं १२,५०० रूपयांनी महागलं आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,२०,२०० रूपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोनं

२४ सह २२ कॅरेट सोनंही महागलं आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,१५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,११,८५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ११,५०० रूपयांनी महागलं आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,१८,५०० रूपये मोजावे लागतील.

१८ कॅरेट सोनं

२४, २२सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९४० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९१,५२० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ९,४०० रूपयांनी महागलं आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,१५,२०० रूपये मोजावे लागतील.

चांदीच्या दरात वाढ

सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५७,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT