Gold-Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Hike Today: आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत जवळपास ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सध्या लगीनसराई सुरु झाली आहे. लगीसराईमध्ये सोने-चांदी घेण्यासाठी खरेदीदारांची मोठी गर्दी होते. सोने-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. सोने-चांदीच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किंमतीमध्ये ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोने-चांदीच्या किंमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. जाणून घ्या सोने-चांदीच्या किंमती. (Gold Silver Rate)

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती (Gold Silver Rate)

आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१५० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,२०० रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ७१,५०० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,८०० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६२,४०० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ७८,००० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत ४४० रुपयांनी वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ ग्रॅम सोने ५,८५० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,८०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,५०० रुपये आहे. आज १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३२० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमती (Silver Price Today)

आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. आज ८ ग्रॅम चांदी ७२४ रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,०५० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT