Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

ग्राहकांसाठी खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामध्ये ९,३०० रूपयांची घट, पाहा लेटेस्ट दर

Gold Price Drop: सोन्याच्या दरात घसरण. १० तोळ्यामागे ९,३०० रूपयांची घट. मात्र, चांदीच्या दरात कोणताही बदल नाही.

Bhagyashree Kamble

  • ग्राहकांसाठी खूशखबर.

  • सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त.

  • २२ अन् १८ कॅरेट सोन्याच्या भावात घट.

नवरात्रोत्सव सुरू आहे. आज चौथी माळ. सणासुदीच्या काळात आपण बऱ्याच नवीन वस्तू खरेदी करतो. नवरात्र आणि दसऱ्याला आपण सोनं हमखास खरेदी करतो. सोनं खरेदीदारांसाठी खूशखूबर आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात ९,३०० रूपयांची घसरण झाली आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आज २५ सप्टेंबर २०२५. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९३० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१४,४४० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ९,३०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,४४,४०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०४,९०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,४९,००० रूपये मोजावे लागतील.

२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८५,८३० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,००० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८,५८,३०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या दरात घसरण जरी झाली असली तरी, चांदीचा दर जैसे थे आहे. चांदीच्या दरात कोणतेही बदल झाले नाही. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,४०,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेणार

Maharashtra Live News Update: - लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

Maharashtra Flood: मदत नाही मिळाली तर शिक्षण सोडून गावी जावं लागेल, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मांडली व्यथा

Voter ID साठी आधार आणि मोबाईल नंबर आवश्यक; निवडणूक आयोगाकडून नियमात मोठा बदल

Dussehra 2025: यंदा दसरा कधी आहे? जाणून घ्या तारीख अन् शुभ वेळ

SCROLL FOR NEXT