Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

gold rate today city-wise 24k 22k : आज देशभरात सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यासह प्रमुख शहरांतील २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today 28 November : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरामध्ये देशभरात आज घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळतेय. जागतिक बाजारात कमकुवतपणा, देशांतर्गत मार्केटमध्ये खरेदीमध्ये घसरण यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,८९० रुपयांवर आला आहे. मुंबई, पुणे, जळगावसह चेन्नई आणि कोलकात्यामध्येही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. (latest gold and silver price in Delhi Mumbai Chennai)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस ४,१५८.३८ डॉलरवर घसरला आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. आज सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळी. दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबादसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरात सोन्याच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते, डॉलर अधिक मजबूत झाला आणि वाढत्या बाँड उत्पन्नामुळे सोन्याची विक्री वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत.

कोणत्या शहरात आज सोन्याचे दर कसे आहेत ?

दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,२७,८९० | २२ कॅरेट - ₹१,१७,२४०

मुंबई: २४ कॅरेट - ₹१,२७,७४० | 22 कॅरेट - ₹1,17,090

अहमदाबाद: २४ कॅरेट - ₹१,२७,७९० | २२ कॅरेट - ₹१,१७,१४०

चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,२७,७४० | २२ कॅरेट - ₹१,१७,०९०

कोलकाता: 24 कॅरेट - ₹1,27,740 | 22 कॅरेट - ₹1,17,090

हैदराबाद: २४ कॅरेट - ₹१,२७,७४० | २२ कॅरेट - ₹१,१७,०९०

जयपूर: २४ कॅरेट - ₹१,२७,८९० | 22 कॅरेट - ₹1,17,240

भोपाळ: २४ कॅरेट - ₹१,२७,७९० | 22 कॅरेट - ₹1,17,140

लखनौ: २४ कॅरेट - ₹१,२७,८९० | २२ कॅरेट - ₹१,१७,२४०

चंदीगड: २४ कॅरेट - ₹१,२७,८९० | 22 कॅरेट - ₹1,17,240

आजचे चांदीचे दर काय ? Silver Price In India Today (28 November 2025) :

एकीकडे सोन्याच्या किंमतीमध्ये घट नोंदवली जात असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ होत आहेत. आज, चांदीची किंमत प्रति किलो ₹१,७३,१०० पर्यंत वाढली आहे. येत्या काळात चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज जागतिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT