Gold Price Today ९ November : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. जळगाव, मुंबईपासून ते दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यापर्यंत सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. लग्नसराई सुरू झाली असतानाच सोन्याचे दर घसरत असल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातारण आहे. आठवडाभरात २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ११६० रूपयांनी घसरण झाली आहे. तर २४ कॅरेटचे सोनं प्रति १० ग्रॅम ९८० रूपयांनी स्वस्त झाले आहे. (Gold Rate Today: 24K, 22K, 18K Gold Prices Drop Again | Check Latest Rates)
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकनं फेडरल रिझर्व्ह बँकची वॅट अॅण्ड वॉच भूमिका, डॉलरचे दरात वाढ या कारणामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹1,22,170/10 इतके आहेत. तर 22 कॅरेटच्या सोन्याचे दर प्रति तोळा ₹1,12,000/ इतके आहेत. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता अन् भोपाळ, लखनौमध्येही सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे.
नवी दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,१२,०००/१० ग्रॅम
मुंबई: २४ कॅरेट - ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,८५०/१० ग्रॅम
अहमदाबाद: २४ कॅरेट - ₹१,२२,०७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,९००/१० ग्रॅम
चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,८५०/१० ग्रॅम
कोलकाता: २४ कॅरेट - ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,८५०/१० ग्रॅम
हैदराबाद: २४ कॅरेट - ₹१,२२,०२०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,८५०/१० ग्रॅम
जयपूर: २४ कॅरेट - ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,१२,०००/१० ग्रॅम
भोपाळ: २४ कॅरेट - ₹१,२२,०७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,११,९००/१० ग्रॅम
लखनौ : २४ कॅरेट - ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,१२,०००/१० ग्रॅम
चंदीगड: २४ कॅरेट - ₹१,२२,१७०/१० ग्रॅम | २२ कॅरेट - ₹१,१२,०००/१० ग्रॅम
आठवडाभरात सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळालाय. पण दुसरीकडे चांदीच्या किंमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात चांदीची किंमत प्रति किलो ५०० रूपयांनी वाढली आहे. देशात चांदीची किंमत प्रति किलो ₹1,52,500 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर प्रति औंस $48.48 इतकी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारात प्रति औंस सोन्याचा दर $3,996.93 इतका आहे. Goldman Sachs च्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. सोन्याची किंमत प्रति औंस $4,900 पर्यंत पोहचू शकते. ANZ च्या रिपोर्ट्सनुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस $4,600 पर्यंत पोहचू शकते. अनेक जागतिक तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीमधील वाढ अद्याप संपलेली नाही. भविष्यात सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.