Gold Price  Saam TVNews
बिझनेस

Gold New Rates : सोनं ८००० रूपये झालं स्वस्त, गेल्या आठवड्यात अचनाक दर आपटले

Why gold prices dropped by ₹8,000 in one week : गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर अचानक सोन्याचे दर आपटले. MCX वर २४ कॅरेट सोनं 2.64% घसरले असून आठवड्याच्या शेवटी सोनं तब्बल ८,८९४ रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरातही ६,९४० रुपयांची घट झाली आहे.

Namdeo Kumbhar

  • आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याने उच्चांक गाठला पण शेवटी मोठी घसरण झाली.

  • MCX वर २४ कॅरेट सोनं 2.64% घसरून ८,८९४ रुपयांनी स्वस्त झाले.

  • चांदीच्या प्रति किलो दरात एका दिवसात ६,९४० रुपयांची घसरण नोंदली.

  • २० दिवसांत सोन्याचे दर एकूण ७,२२४ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

Gold Rates Latest News In Marathi : मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. पण अचानक सोन्याचे दर आपटले अन् सोन्याची किंमत स्वस्त  (Gold Rate Crash) झाली. MCX वर सोन्याची किंमत 2.64% कमी झाली तर चांदीच्या दरात एका दिवसात ६९४० रूपयांनी कमी झाले.

आठवड्याच्या सुरूवातील सोन्याने उच्चांक गाठला होता. पण शुक्रवारी अचानक सोन्याच्या दरात घसरण आली. एमसीएक्सवर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा 2.64% घसर झाली. देशांतर्गत मार्केटमध्येही सोन्याच्या दरात घसऱण पाहायाला मिळाली. सोन्याचे दर आठवड्याच्या शेवटी तब्बल ८ हजार रूपयांनी स्वस्त झाले.

MCX वर सोनं किती स्वस्त झाले?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी MCX वर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ५ डिसेंबर रोजी एक्सपायर होणाऱ्या सोन्याचे दर 1,21,800 रूपयांनी सुरूवात झाली. गेल्या आठवड्यात MCX वर हे दर 1,32,294 पर्यंत पोहचले होते. पण आठवड्याच्या शेवटीपर्यंत 8,894 रूपयांनी स्वस्त झाले. दरम्यान, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. शुक्रवारी एक किलो चांदीचे वायदा दर अचानक 6,940 रुपये स्वस्त झाले. आठवडाभरात चांदीचे दर 14,885 रुपये प्रति किलो स्वस्त झाले.

२० दिवसात ७ हजारांनी स्वस्त झाले

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळेल. २० ऑक्टोबर रोजी प्रति तोळा सोन्याची किंमत 1,30,624 रुपये इतकी होती. सुट्ट्या सोडून २० दिवसांत सोन्याचे दर 7,224 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर काय? Gold Rate

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळ IBJA.Com नुसार आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली होती. पम आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,26,554 रुपये होता. पण शुक्रवारी यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात प्रति तोळा 1760 रुपये स्वस्त झाले. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ११४,३११ रुपयांवर पोहोचलाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ९३,५९६ रुपयांवर आला. देशांतर्गत बाजारात चांदीचा भावही एकाच दिवसात १,६२,७३० रुपयांवरून १,५९,३६७ रुपयांवर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'तू खोटे बोलतेस...' सलमान खाननंतर रोहित शेट्टीने केली तान्या मित्तलची पोलखोल

Margashirsha Lakshmi Puja: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे?

Jalna Crime: वहिनीसोबतच्या प्रेमासाठी रक्ताचं नातं केलं परकं; कट आखत परमेश्वरला संपवलं

Kalyan : लग्नसमारंभात कल्याण-डोंबिवलीत ३ दिग्गज नेते एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रकाश आंबेडकर–काँग्रेसची हातमिळवणी; राज्यातील आणखी एका जिल्ह्यात युतीचा नवा प्रयोग, वंचितला किती जागा मिळाल्या?

SCROLL FOR NEXT