Gold price jumps by ₹7,500 in one day in Jalgaon market : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोनं अन् चांदीच्या किंमतीत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 7 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 650 रुपयांच्या तर 3 लाख 32 हजार 650 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचले आहेत. सलग तीन दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये तेजी असून दराने आजपर्यंतचे विक्रम मोडले आहेत.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक करणाऱ्या सोने आणि चांदीच्या दराने बुधवारी आणखी नवा रेकॉर्ड केला. दोन्ही धातुंनी ऐतिहासिक उंची गाठल्यानंतर पुन्हा दरवाढीच्या भीतीने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांची पळापळ झाली. ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या चर्चेसोबतच अमेरिका युरोपीय देशांवर टॅरिफ वॉर लादत आहे. या जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता वाढली असून, त्याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर दिसून येत आहे. याशिवाय, जगभरात चांदीची भौतिक कमतरता जाणवत असल्याने चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे.
सोने आणि चांदी या पारंपरिकरित्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात. देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळतात. सध्या चांदीचा पुरवठा मर्यादित असून मागणी वाढत असल्याने तिच्या किमती अधिक वेगाने चढत आहेत. लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी कायम आहेच, पण सोने आणि चांदी या पारंपरिकरित्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात. देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळतात. सध्या चांदीचा पुरवठा मर्यादित असून मागणी वाढत असल्याने तिच्या किमती अधिक वेगाने चढत आहेत.
लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी कायम असली, तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी टाळत आहेत. बहुतांश ग्राहक आपल्या बजेटनुसारच खरेदी करत असून, तुलनेत हलके आणि आकर्षक दागिने अधिक पसंत केले जात आहेत. मात्र, लग्नसमारंभांची गरज लक्षात घेता जड दागिन्यांचाही साठा दागिन्यांच्या दुकानांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.