Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

Gold Price Today; 19 Nov 2025 Gold Rates : आज सोन्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १२० रुपयांनी तर २२ कॅरेट सोनं ११० रुपयांनी वाढलं आहे. देशात चांदीच्याही दरात तब्बल ३ हजार रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.

Namdeo Kumbhar

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि फेडच्या व्याजदर कपातीच्या संकेतामुळे सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली.

  • २४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १२,४८६ रुपये तर २२ कॅरेट सोनं ११,४४५ रुपये झाले.

  • देशात सोन्याचा १० ग्रॅम दर १,२४,८६० रुपये झाला असून एका दिवसात १,२०० रुपयांनी वाढ झाली.

  • चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदली जाऊन प्रति किलो ३ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Rate Today, Check Latest 22K & 24K Price in City Wise Mumbai pune : सोनं आणि चांदीच्या दागिन्यांच्या किमतीम अचानक वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेन बाजारपेठेतील बदलामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा किंमतीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १२०० रूपयांनी वाढ झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज सोन्याची किंमत वाढली आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने येत्या आठवड्यात लग्न, कान टोचणे आणि ग्रह संक्रमण असे विशेष प्रसंग असलेल्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. वस्तूंच्या किमती वाढल्याने आधीच त्रस्त असलेल्या लोकांना लग्न सराईत सोन्याचे दर हे आणखी एक टेन्शन वाढलेय. अमेरिकन डॉलरच्या दरात स्थिरता, सोन्याच्या मागणीत वाढ आणि अमेरिकन सेंट्रल बँक म्हणजेच फेडने डिसेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात कपात करणार असल्याच्या शक्यतेमुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ दिसून आल्याचे सांगण्यात येतेय.

बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज (बुधवार, १९ नोव्हेंबर) प्रति ग्रॅम १२,४८६ रुपये इतकी झाली. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) बाजार बंद झाला तेव्हा हीच किंमत १२,३३६ रूपये इतकी होती. म्हणजे, प्रति ग्रॅम १२० रुपयांनी दर वाढले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ११० रूपयांनी वाढून ११,४४५ रुपये धाली. १८ कॅरेट सोन्याची (ज्याला ९९९ सोने असेही म्हणतात) किंमत आज ९,३६४ रुपये प्रति ग्रॅम आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२४,८६० रुपये इतका झालाय. हा दर मंगळवारच्या तुलनेत हे दर १२०० रूपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेटचे सोन्याचा दर ११०० रूपयांनी वाढून

१,१३,३५० इतकी झाली आगे. १८ कॅरेट सोन्याची (ज्याला ९९९ सोने असेही म्हणतात) किंमत ९३,६४० रुपये इतकी झाली. दरम्यान, देशात आज चांदीचे दर तीन हजार रूपयांनी वाढले आहे. चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळालेय. चांदीचे दर प्रति किलो ३ हजार रूपयांनी वाढले आहेत. आज चांदीचे दर १,६५,००० प्रति किलोग्रॅम इतकी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण अडकले

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानविषयी या गोष्टी माहित आहेत का?

Shocking: कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बेळगावमधील भयंकर घटना

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

SCROLL FOR NEXT