Gold prices google
बिझनेस

Gold Rate Today : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची चांगली संधी; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Jalgaon Gold Price Today : जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात पाच दिवसांमध्ये ४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आजचे २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे ताजे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरू आहे.मागच्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत ४ हजार घट झाली आहे. बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराणमधला तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत आहेत.

जळगाव सराफ बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव १.४२ लाख तर १ किलो चांदीचा दर २.२२ लाख इतका नोंदवला गेला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात सुमारे ४०००, तर चांदीच्या दरात तब्बल १३,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

सराफ व्यावसायिकांच्या मते, जागतिक स्तरावर युद्धाची परिस्थिती कायम राहिल्याने सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते. पण परिस्थिती शांत झाल्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच GoodReturns नुसार, प्रसिद्ध केलेल्या ताज्या किंमतींनुसार आज २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक किंवा खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

Goodreturns नुसार, आजचा १ तोळा सोन्याचा दर पुढील प्रमाणे आहे:

आज २४ कॅरेटच्या १ तोळं सोन्याची किंमत १४२० रुपयांनी घसरली आहे. तर याची २४ कॅरेट १ तोळ्याची किंमत ही १,४२,९१० रुपये आहे.

चांदीचा आजचा दर

आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ किलो चांदीचा दर २,३५,००० इतका कायम आहे. सोन्याची किंमत कमी झाल्यामुळे लग्नसराई, सण - उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याची योजना असलेल्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण खरेदी करण्याआधी आपल्या शहरातल्या सराफ बाजारातला प्रत्यक्ष दर एकदा तपासून घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT