Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याला चकाकी, १० तोळा सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold-Silver Price: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. १० तोळा सोनं ४,३०० रुपयांनी महागले. तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली. आजचे सोनं-चांदीचे दर किती वाचा...

Priya More

Summery -

  • सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे.

  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसला.

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३०० रुपयांनी वाढ झाली.

  • तर एक किलो चांदीचे दर ३००० रुपयांनी वाढले.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत वाढत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये आजही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,५८० रुपये मोजावे लागणार आहेत. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ४३०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज हे १० तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ११,२५,८०० रुपये द्यावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाल १,०३,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४००० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,३२,००० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८४,४४० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ८,४४,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १३८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,३८,००० रुपये खर्च करावे लागतील.

तुमच्या शहरातील सोन्याचे २४ कॅरेटचे आजचे दर किती?

मुंबई - ११,२५८ रुपये

पुणे - ११,२५८ रुपये

दिल्ली - ११,२७३ रुपये

चेन्नई - ११,३०२ रुपये

तुमच्या शहरातील चांदीचे १० ग्रॅमचे दर किती?

मुंबई - १,३८० रुपये

पुणे - १,३८० रुपये

दिल्ली - १,३८० रुपये

चेन्नई - १,४८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बकरी ईदनिमित्त दुर्गाडीवर तणाव; नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स तोडले| Video

Maharashtra News Live Update: अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तुरुंगवास

Heatwave In Nagpur: नवतपात सूर्याचा कहर, नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

SCROLL FOR NEXT