Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! १० तोळा सोनं २२०० रुपयांनी स्वस्त, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold -Silver Price Today: आज सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत हे एकदा जाणून घ्या...

Priya More

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर वाढले होते. आज सोन्याचे दर कमी झाल्यामुळे खरेदी करण्याची चांगली संधी आहे. २४ कॅरेच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याचे दर १,११,७१० रुपये इतके झाले आहे. तर चांदीचे दर देखील घसरले आहेत. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी जाणून घ्या सोनं-चांदीचे आजचे दर...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,११,७१० रुपये मोजावे लागणार आहेत. २४ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २२०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ११,१७,१०० रुपये द्यावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाल १,०२,४०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २००० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,२४,००० रुपये द्यावे लागणार आहेत.

त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ८३,७८० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ८,३७,८०० रुपये द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात दोन रुपयांनी घट झाल आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १३२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी घट झाली आही. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १,३२,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Narendra Modi: सामान्य चहावाला ते देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदींचे हे फोटो पाहिलेच नसतील

Pratapgad Fort History: शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक महत्त्व, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

SCROLL FOR NEXT