Gold Price Today; 29 Oct 2025 Gold Rates in marathi : आठवडाभराच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमेरिका-चीन मध्ये ट्रेड तणाव कमी झाल्यामुळे सराफा बाजारात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याची किंमतीतही मोठी वाढ झाली. MCX आणि देशांतर्गत सोन्याच्या बाजारात वाढ झाली आहे. प्रति तोळा ७०० ते ८०० रूपयांनी किंमत वाढ झाली. (Gold Price In India Today )
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. ७ ऑक्टोबरनंतर सोन्याची किंमतीत घट पाहायला मिळाली होती. पण आज सकाळी सराफा बाजार उघडताच पुन्हा सोन्याची किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ७६ रूपयांनी वाढली आहे. बुधवारी सोनं प्रति ग्रॅम 12,173 रूपये इतके आहे. तर २२ कॅरेटचे सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 11,160 रूपये इतकी आहे. मंगळवारच्या तुलनेत २२ कॅरेटचे सोनं ७० रूपयांनी महागलं. १८ कॅरेटचे सोनं मंगळवारच्या तुलनेत ५७ रूपयांनी महागलेय. (22 carat and 24 carat gold rates in Maharashtra)
२४ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत आज देशात 1,21,730 रूपये इतकी आहे. मंगळवारच्या तुलनेत ७६० रूपयांनी महागलेय. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ७०० रूपयांनी वाढून 1,11,600 रुपये इतकी झाली. 18 कॅरेट सोन्याची किंमत 91,340 रुपये तोळा इतके झालाय.
देशातील चांदीच्या किमतींमध्येही आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळली. मंगळवारच्या तुलनेत चांदीचे दर आता प्रति ग्रॅम ₹१५२ आणि प्रति किलोग्रॅम ₹१५२,००० आहेत. आज चांदीची किंमत प्रति किलो ₹१,००० ने वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.