Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं ३२०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर

Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याच्या दरात ३२०० रुपयांनी घसरण झाली. तर चांदीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. वाचा आजचे दर किती?

Priya More

Summary -

  • नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले.

  • २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ३२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील घसरण झाली.

  • चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज चांदीचे दर १४० रुपये प्रति ग्रॅम आहे.

सोनं-चांदी खरेदी करणऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहे. २४ कॅरटचे १० तोळा सोनं ३२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खरेदीची सुवर्णसंधी आहे. तर चांदीच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झाली नाही. म्हणजे चांदीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते वाचा सविस्तर...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१५,३७० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ११, ५३,७०० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ३०० रुपयांनी कमी झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०५,७५० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ३००० रुपयांनी कमी झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १०, ५७,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १०,६०,५०० रुपये मोजावे लागले होते.

तर आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात २४० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८६,५३० रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २४०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८,६५,३०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीचे दर स्थिर आहेत. चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कालच्या ऐवढीच किंमत मोजावी लागेल. आज एक ग्राम चांदीचा दर १४० रुपये आहे. तर १ किलो चांदी खरेदीसाठी १,४०,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तीन शिलेदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटात जाणार

Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Cyclone Alert : चक्रीवादळाचं देशात थैमान, मच्छिमारांना मोठा फटका, IMD चा काय आहे इशारा ?

SCROLL FOR NEXT