Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळा सोनं १,१०० रुपयांनी वाढले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोनं खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी आजचे २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर किती हे घ्या जाणून....

Priya More

Summary -

  • सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली

  • आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली.

  • १ तोळा सोनं खरेदीसाठी १,०२,३३० रुपये मोजावे लागणार.

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली.

  • चांदीचे दरही वाढले आहेत. १ किलो चांदीसाठी १,१६,००० रुपये खर्च करावे लागतील.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. आजही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर आज २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. आज चांदीचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी तुम्ही आजचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ११० रुपयांनी महागले असून ते खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०२,३३० रुपये मोजावे लागणार आहेत. हे सोनं मंगळवारी १,०२,२२० रुपयांनी विकले गेले. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह १ लाख ५ हजारांवर खर्च करावा लागेल. २४ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १०,२३,३०० रुपये द्यावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये आज १०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ९३,८०० रुपये मोजावे लागणार आहे. काल याच सोन्याचे दर ९३,७०० रुपये इतके होते. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ९,३९,००० रुपये द्यावे लागणार आहेत. काल हेच सोनं खरेदीसाठी ९,३७,०० रुपये द्यावे लागले होते.

तसंच, आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ७६,७५० रुपये मोजावे लागणार आहेत. हेच सोनं मंगळवारी ७६,६७० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७,६७,५०० रुपये द्यावे लागणार आहे.

त्याचसोबत आज चांदीचे दर देखील वाढले आहेत. आज १ ग्रॅम चांदीचे दर १ रुपयांनी महागले आहेत. १ ग्रॅमसाठी तुम्हाला ११६ रुपये मोजावे लागणार आहेत. १ किलो चांदीचे दर १००० रुपयांनी महागले असून ते खरेदीसाठी तुम्हाला १,१६,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : घसा दुखणे गंभीर आजार? Throat Cancer ची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या

Thane Traffic: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ठाण्यातील वाहतूक मार्गात पुढचे ३ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढेल?

West Bengal Violence : आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफळला

Maharashtra News Live Update: नसरापूर घटनेतील आरोपीला १२ मे पर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT