Gold Price Hike Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा वाढली, 10 ग्रॅमचा भाव ₹९७ हजार पार, वाचा आजचे दर

22 carat vs 24 carat gold price : आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ₹९७,५०० वर गेला. मुंबई आणि पुण्यातील २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर, चांदीचा भाव आणि बाजारातील घडामोडी जाणून घ्या.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Gold Rate Today In Marathi : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याला झळाळी मिळाली. मंगळवारच्या तुलनेत सोन्याची किंमत वाढली. गेल्या आठवड्याते एक तोळा सोन्याची किंमत ९५ हजार रूपयांवर आली होती. पण मागील तीन ते चार दिवसांत सोन्याच्या किंमतीमध्ये (gold price per 10 gram in India) पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. एक तोळा सोन्याची किंमत आज सराफा बाजारात ९७५०० रूपये इतकी झाली आहे.

यंदा सोन्याच्या किमतीत १४ % पेक्षा जास्त वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात तब्बल ३५ % ची तेजी नोंदवली गेली आहे. अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जात, त्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल जास्त दिसत आहे. मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याची किंमत प्रति तोळा २४०० रूपयांनी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किंमतीत वारंवार चढउतार पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७५०० इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९४०० रूपये इतकी झाली आहे. मुंबई आणि पुण्यात सोन्याची काय किंमत आहे पाहूयात?

मुंबईमध्ये आज सोन्याची काय किंमत ? gold price in Mumbai today

goodreturns.in नुसार आज राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट एक तोळे सोन्याची किंमत ८९४५० रूपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७५७० रूपये इतकी आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीपेक्षा कमी आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेटचे एक तोळा सोनं ८९३०० रूपयांना घेता येतं, तर २४ कॅरेटचे एक तोळा सोनं ९७४२० रूपयांना मिळते.

पुण्यात २२ कॅरेट सोनं किती रूपयांना मिळते ?

मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा भाव १५९ रुपयांनी वाढून ८८,८८५ रुपये प्रति तोळा इतकी झाली आहे.

मुंबई आणि पुण्यातील स्थानिक सराफा बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने खरेदीदारांमध्ये सावधगिरी दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याचा भाव $3,024 च्या उच्चांकावर पोहोचला आहे.

सराफा बाजारात चांदीच्या किमतीत सौम्य चढ-उतार दिसून येत आहे. आज चांदीचा भाव एक लाख रुपये प्रति किलोग्राम इतका आहे. मंगळवारच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत दोन हजार रूपये वाढ झालेली दिसून येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT