Today's Gold and Silver Price Saam tv news
बिझनेस

Gold Rate: घसरणीनंतर सोन्याला पुन्हा चकाकी; दर वाढले की घसरले? मुंबई, पुण्यात १० ग्रॅम सोन्याचा दर किती ?

Today's Gold and Silver Price: सोनं प्रति १० ग्रॅम ₹९८,५०० वर पोहोचलं असून चांदी ₹१.१० लाख किलो झाली आहे. दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ देणारी ठरली आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दराने निच्चांकी गाठली होती. मात्र, आता वधारत चालला आहे. आज महिन्याचा दुसरा दिवस. आज सोन्याच्या दरात तब्बल १००० रूपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सराफा बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर सध्या ९८,५०० रूपये, तर २२ कॅरेट सोनं ९०,३०० रूपये प्रति १० ग्रॅम इतकं आहे. तर, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा दर १,१०,७०० रूपये आहे. आज चांदी ३००० रूपयांनी महागली आहे.

आज बुधवार, २ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. प्रमुख शहरांतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात उच्चांकी पाहायला मिळत आहे. दिल्लीत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,३६० रूपये तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५६० रूपये इतकं आहे. तर, मुंबईतही १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,२१० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,४१० रूपये आहे. पटना लखनऊ,जयपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत याच दराभोवती आहे.

चांदीच्या दरातही वाढ

सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव १,१०,७०० रूपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ३००० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला झळाली बसली आहे.

देशात सोन्याचे दर कसे ठरवले जातात?

भारतात सोन्याची किंमत दररोज बदलते. कारण ती अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, जागतिक सोन्याचा दर, डॉलर आणि रूपयाच्या किमतीत फरक. तसेच सरकार किती कर आकारात आहे, यावरही सोन्याचे दर ठरवले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT