Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate: १० तोळा सोन्याच्या दरात ४४०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती हे घ्या जाणून...

Priya More

सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना आता तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या दर देखील बदलत असतात. आज तुमच्या शहरामध्ये सोन्याचे प्रति तोळा किती दर आहेत ते घ्या जाणून....

गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी वाढ होऊन ते ९९,३३० वर पोहचले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांवर पैसे खर्च करावे लागतील. १० तोळा २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळा २४ कॅरेटचे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,९३,३०० रुपये खर्च करावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९१,०५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटचे १० तोळं सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,१०,५०० रुपये द्यावे लागतील.

तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ३३० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी ७४,५०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळे सोन्यासाठी तुम्हाला ७,४५,००० रुपये खर्च करावे लागतील. तर देशात चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,११,००० रुपये खर्च करावे लागतील.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर -

मुंबई -

१८ कॅरेट - ९,९३३ रुपये

२२ कॅरेट - ९,१०५ रुपये

२४ कॅरेट - ७,४५० रुपये

पुणे -

१८ कॅरेट - ९,९३३ रुपये

२२ कॅरेट - ९,१०५ रुपये

२४ कॅरेट - ७,४५० रुपये

दिल्ली -

१८ कॅरेट - ९,९४८ रुपये

२२ कॅरेट - ९,१२० रुपये

२४ कॅरेट - ७,४६२ रुपये

चेन्नई -

१८ कॅरेट - ९,९३३ रुपये

२२ कॅरेट - ९,१०५ रुपये

२४ कॅरेट - ७,५१५ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT