Today's Gold and Silver Price Saam tv news
बिझनेस

Gold Price: आठवडाभरात सोनं ८००० रुपयांनी वाढले, २०२४ मध्ये दसऱ्याला सोन्याचे दर किती होते?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. आठवडाभरामध्ये सोन्याचे दर ८ हजार रुपयांनी वाढले आहे. तर चांदीचे दर देखील वाढले आहे. गेल्यावर्षी दसऱ्याला सोन्याचे दर किती होते हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात तब्बल ८ हजारांनी वाढ झाली आहे.

  • आज १० ग्रॅम सोनं १ लाख १७ हजार रुपयांवर पोहोचले आहे.

  • चांदीचा दरही वाढला आहे. १ किलोसाठी १ लाख ४६ हजारांवर गेला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या दसरा म्हणजेच विजयादशमीला सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करतात. पण सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होत चालली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या ८ दिवसांत सोन्याच्या दरात ८००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोन्याचे १ ग्रॅम सोनं १३०० रुपयांनी महाग झाले. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती वाढ झाली आहे ते घ्या जाणून...

मिळालेल्या माहितीनुसार, विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. गेल्या ८ दिवसांत सोन्याच्या किंमती ८ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. जगातील अनेक देशात सुरू असलेले युद्ध आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सोनं- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे मत आता तज्ज्ञाकडून व्यक्त होत आहे.

सणांचा कालावधी सुरु झाल्याबरोबर सोनं खरेदीला सुरुवात होते आणि ते होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात झालेली ग्राहकांसाठी काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक झाली आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ११०० रुपयांनी वाढले आहे. तसंच, १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ९०० रुपयांनी महागले आहे.

आज सोनं- चांदीचे दर किती?

सोने - १ लाख १७ हजार (१० ग्रॅम)

चांदी - १ लाख ४६ हजार (१ किलो)

गेल्या वर्षी विजयादशमीला काय होते सोनं- चांदीचे दर?

सोने - ७६ हजार (१० ग्रॅम)

चांदी - ९३ हजार (१ किलो)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT